इटलीत अडचणीच्या आणि गोंधळाच्या परिस्थितीत फॅसिझम निर्माण झाला.
‘फॅसिझम’ हा शब्द ‘फॅसिओ’वरून निघाला आहे. ‘फॅसिओ’ म्हणजे लाकडांच्या जुटीमध्ये बांधलेली कुऱ्हाड. रोमन साम्राज्याचे ते चिन्ह होते. फॅसिझमचा साम्राज्यवाद आणि युद्धखोर वृत्ती यांचा त्या चिन्हाने चांगला बोध होतो. मुसोलिनीने उभारलेल्या फॅसिस्ट पक्षात मुख्य भरणा होता, तो बेकार कामगारांचा आणि मध्यमवर्गातील दिशाहीन तरुणांचा. भांडवलदारांच्या व इतर श्रीमंत मंडळींच्या पाठिंब्यामुळे तो हलके हलके वाढत गेला.......